in

#BoardExams2021 : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या…

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकृत घोषणा केली असून दहावीची परीक्षा जून महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. तर बारावीची परीक्षा मे महिन्यात होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच; व्यावहारिक भूमिका घ्या…

RR vs PBKS: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये आज सामना