in

SSR Death Case | सुशांतच्या जवळच्या मित्राला NCBने केली अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. गेल्यावर्षी या घटनेने संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं. देशातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. या घटनेचा तपास सध्या एनसीबीकडे आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

एनसीबीने सिद्धार्थ पिठानी या सुशांतच्या मित्राला अटक केली आहे. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…अन्यथा महाराष्ट्रात फिरताना निलेश राणेंना विचार करून फिरावा लागेल

पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे 1 जूनपासून राज्यभर आंदोलन