in

गोंदीयात एसटीच्या ८२ फेऱ्या वाढविल्या

शाळांमुळेच जास्त फेऱ्यांचे नियोजन

उदय चक्रधर, गोंदीया
राज्यातील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात अली असल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल होत आहेत. हळुहळु सर्व सेवा सुरु करून विस्कटलेली घडी परत बसविण्याची तयारी होत आहे.

सुमारे दीड वर्ष बंद असलेले शाळा- महाविद्यालय राज्यात ४ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहेत. त्यात आता दिवाळी तोंडावर असून वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी किंवा नातेवाईकांकडे जाण्याच्या तयारीत असतात. यासाठी आता रेल्वे व एसटीही सुरु झाल्या आहेत. हे बघता आता कोरोनामुळे नुकसानीत गेलेल्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाला थोडा दिलासादायक वातावरण तयार होत आहे. यातूनच आगारांनी बसेसच्या ८२ फेऱ्या वाढविल्या आहेत. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार या दृष्टीने हा काळ अतिमहत्त्वाचा ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमेरिकन महिला टेनिसपटूनं मोदी-शाहंवर काय टीका केली?

परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ; संजय पूनमिया विरोधात सिन्नरमध्ये गुन्हा दाखल