in

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटीची धाव; ५ हजार ८०० प्रवाशांना सुखरूप सोडले

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एसटीने धाव घेतील आहे. एसटीच्या मदतीमुळे ५ हजार ८०० प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

पुणे-मुंबई मार्गावर ७४ एसटी सोडल्या

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Raigad rain update | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

तिहार जेलमध्ये सुशील कुमारला मिळणार टीव्ही…