in ,

अकोल्यात एस टी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन

अमोल नंदकुमार, अकोला | दसरा हा सण अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे दसरा हा सण साजरा कसा करावा असा प्रश्न आता महामंडळ च्या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहीला आहे.

अगोदर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ४ तारखेच्या आत वेतन देण्यात येत होते मात्र आज १४ तारीख असूनही वेतन मिळाले नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून आज अकोल्यातील आगार क्रमांक १ च्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

सर्व वाहक आणि चालकांनी बस एस टी डेपो च्या आवारात लावून प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली . तर कर्मचायांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्रवांशांचा चांगलाच हिरमोळ झाला अलस्याचे दीसून येते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचं दुर्लक्ष – चित्रा वाघ

सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाचा झटका