in

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करा; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. करोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून , या विषयाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहे. त्याकडे राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात लोकलमधून प्रवास करण्यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याचा सल्ला राज यांनी दिला आहे. “मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी”, असं राज यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रविण तरडेचा मनसेच्या दहीहंडीला पाठिंबा

Gold Price| स्वस्त झालं सोनं