in

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; निर्बंध कडक होणार?

राज्यात सध्या संचारबंदी आणि कलम १४४ लागू आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढ कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लॉकडाउन करणार की निर्बंध आणखी कडक करणार, यासंदर्भातील निर्णय या बैठकीत होऊ शकतो.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: यासंदर्भातील संकेत दिले होते. तसंच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा राज्यात लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध कडक करून संपूर्ण लॉकडाउन केला जाऊ शकतो, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

AB de Villiers पुन्हा दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणार

आता 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण; मोदी सरकारचा निर्णय