in

…तर ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा भासणार नाही; राज्य सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे नागरिकांना आंदोलन अथवा इंजेक्शनसाठी ताटकळत रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार आता सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. याबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर केंद्र शासनाने बंदी आणलेली आहे, त्या कंपन्यांनी जर आपल्या राज्य शासनाला निर्यातीसाठी तयार केलेला रेमडेसिवीरचा जो साठा जर दिला तर पाच-सात दिवसांत रेमडेसिवीरचा जो तूटवडा भासत आहे, तो तूटवडा भासणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यशासन व केंद्र शासनाच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर जाऊन घेऊ किंवा मुख्यमंत्री देखील या संदर्भात केंद्र शासनाशी बोलणं करतील असा विश्वास देखील टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.

१५ कंपन्यांवर निर्यात बंदी केली आहे.त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ त्यांच्या निर्यात बंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न राज्यसरकार करत आहे. तो जर कायदेशीरदृष्टीने यशस्वी झाला तर राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवड्याचा प्रश्न सुटणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील तुरूंगातही कोरोनाचं थैमान

Online Robbery| डोंबिवलीच्या IDBI बँकेवर ऑनलाईन दरोडा