in

डिझेलला सोडचिठ्ठी; राज्य सरकार एसटीला देणार १४० कोटी

एसटीची घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोझा पडत असल्यामुळे महामंडळ आर्थिक गर्तेत सापडले. महामंडळावरील आर्थिक बोझा कमी करण्यासाठी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी रिट्रोफिटमेंटसाठी एकूण १४० कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२१-२०२२ च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली असल्याची माहिती ॲड. परब यांनी दिली.

एसटी महामंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. रिट्रोफिटमेंटसाठी एकूण १४० कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली होती. महामंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२१-२०२२ च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली आहे, असे ॲड. परब यांनी सांगितले. त्यानुसार डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपुरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपुरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री ॲड. परब यांनी केले आहे.

१ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतर करणार

एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.डिझेलवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग एम्समध्ये दाखल

आमदार राजू नवघरेंकडून गंभीर चूक; ‘त्या’ कृतीवर म्हणाले…