in

आज MPSC ची राज्य सेवा पूर्व परीक्षा

आज MPSC ची राज्य सेवा पूर्व परीक्षा आहे. राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचे परिपत्रक एमपीएससीकडून काल जाहीर करण्यात आले आहे.या परिपत्रकात उमेदवारांना दोन्ही सत्रासाठी मास्क ,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझरचे किट देण्यात येणार असून त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षा देताना करायचा आहे.

यासोबतच ज्या उमेदवारांना सर्दी, ताप किंवा करोना संबंधित लक्षणे आढळत असतील तर संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी-कर्मचारी यांना तातडीने कळवावे लागणार आहे. अशा उमेदवारांची स्वतंत्र्य बैठक कक्षात व्यवस्था करण्यात येणार असून त्यांना पीपीई किट सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परीक्षा दिल्यानंतर परीक्षा उपकेंद्र होऊन जाताना सुद्धा उमेदवारांनी सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हे तर षडयंत्र… अनिल देशमुखांनी विचारले महत्त्वाचे प्रश्न!

परमबीर सिंह लेटर बॉम्बप्रकरणी नवा ट्विस्ट, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण, म्हणाले…