in

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये भाजपच्यावतीने आंदोलनला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन देशमुख यांची हकालपट्टी होईपर्यंत चालूच राहील, असा इशारा असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. देशमुख यांचा राजीनामा घेऊन सरकारने साडेअकरा कोटी जनतेची माफी मागायला हवी, असे पाटील म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा – तृप्ती देसाई

शरद पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यांची दिल्लीला बोलावली बैठक