in

कसारा घाटात दरड कोसळली; इगतपुरी स्थानकात प्रवाशांचा खोळंबा

मंगेश जोशी | कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

कल्याण ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे रुळा खालील खडी वाहून गेल्याने मुंबई कडून भुसावळ कडे व भुसावळ कडून मुंबई कडे जाणाऱ्या दोन्ही ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईहून भुसावळ कडे येणाऱ्या काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर मुंबई मध्ये येणाऱ्या गाड्यांना इगतपुरी नाशिक मनमाड भुसावळ या स्थानकावर थांबवून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाड्या रद्द झाल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश ,बिहार, बंगाल मधून मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हीना पांचाळला अखेर जामीन मंजूर …

आता मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळावीच लागणार