in

जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

अनिल घोडविंदे | मुंबई-आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेने महामार्गावर सर्वत्र माती आणि दरड पडली आहे. त्यामुळे आता शहापुरात रेल्वेसह महामार्ग देखील ठप्प झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली असून नाशिक कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे सदस्य शाम धुमाळ व त्यांची टीम दाखल झाले असून महामार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

शहापूर तालुक्यात पावसाने कहर केला असून अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत तर रेल्वे ट्रकवर देखील पाणी आलं आहे. कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे, तसेच आता मुंबई-आग्रा महामार्गावर ललित कंपनी समोरील संपूर्ण महामार्गाच पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यात बेंदूर सण साजरा

कसारा घाटात दरड कोसळली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत