in

महाडमध्ये दरड कोसळली; 32 घरे गेली मातीखाली

भारत गोरेगावकर | रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 32 घराचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तसेच या घटनेत असंख्य नागरिक बेपत्ता आहेत, याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही आहे.

महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमीटर अतंरावर असलेल्या तळई गावात दरड कोसळली आहे. या घटनेत 32 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंहसह शिवसेना आमदारांच्या भावाविरुद्ध खंडणीचा गुन्हा

वाईत कुरुंढे आणि देवरुखवाडी इथं भुस्खलन; 5 घरं ढिगाऱ्याखाली