in

महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया,पोटातून ५ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नवजीवन रुग्णालयात महिलेची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. महिलेच्या पोटातून चक्क ५ किलोचा गोळा काढण्यात आला. हा गोळा ओरटीन्स नावाचा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही महिला अकोला जिल्ह्यातील अंदुरा गावची आहे. त्याचं नाव ज्योती नाईक असून गेल्या कित्येक दिवसांपासून त्या पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. अनेक रुग्णालयात त्यांनी पोटाच्या आजारासाठी उपचार घेतले. त्यावर उपाय मात्र मिळाला नाही. अखेर त्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नवजीवन रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्या. 

डॉक्टरांनी ज्योती नाईक यांची सोनोग्राफी केली असता चक्क महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचं निदर्शनात आलं. डॉक्टरांनी महिलेला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. अखेर दोन तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये महिलेच्या पोटातून चक्क ५ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं. या ऑपरेशन मधून महिला सुखरूप बाहेर आली.त्यामुळे ज्योती नाईक सह तिच्या पतीने डॉक्टरांचे आभार मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

१९ सप्टेंबरपासून होणार आयपीएलचे उर्वरित सामने

सत्याग्रही घाटात ‘द बर्निग’ ट्रक