in ,

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकर्‍याचा बळी शहाजानपुरात अशोक मतेची गळफास घेऊन आत्महत्या

बीड : विकास माने | दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍याला यावर्षी मुसळधार पावसामुळे ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी अक्षरश: उद्विग्न झाल्याचे दिसून येत असून बीड तालुक्यातील नाथापूर जवळ असलेल्या शहाजानपूरमध्ये पावसामुळे उद्ध्वस्त झालेली शेती आणि भरून न येणारे नुकसान पाहता कर्जबाजारी असलेल्या तरुण शेतकर्‍याने शेतातच रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील शहाजानपूर येथील अशोक बाबासाहेब मते (वय 40) या तरुण शेतकर्‍याने रात्री सात वाजण्याच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

रात्री उशीरा हे प्रकरण उघडकीस आले. अशोकने साडे सहा वाजण्याच्या सुमारास घरी जेवण केले आणि तो थेट शेतात गेला.
यावर्षी मुसळधार पावसामुळे शेतातलं उभं पीक पाण्याखाली गेलं. उत्पन्नाचे साधन नाही. आधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून? यासह अन्य आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले. रात्री तो उशीरापर्यंत घरी आला नाही.

शेताकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर घरातले लोक शेताकडे गेले असता अशोकचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला. शेतकर्‍याच्या या आत्महत्येच्या घटनेने पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन

शहेंशाहवली दर्गाचा आज संदल आ. विनायक मेटे यांनी चढवली चादर