in

CSK vs SRH:हैदराबादला पहिला धक्का; जॉनी बेअरस्टो ७ धावा करून बाद

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 23 वी मॅच आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांदरम्यान खेळविली जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियवर हा सामना रंगणार आहे. या सामन्याचे नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या पीचवर दोन्ही संघ आतापर्यंत 14 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये 10 सामन्यांत चेन्नईने हैदराबादला धोबीपछाड दिला आहे तर केवळ चार सामन्यांत हैदराबादने चेन्नईला नमवलं आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 5-5 सामने खेळले आहेत. पहिल्या 5 पैकी सलग 4 सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत चेन्नई दुसर्‍या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे हैदराबादचा संघ गुणतालिकेत सर्वांत तळाशी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ते’ ट्विट का डिलीट केलं?, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

पंढरपूरचा निकाल रात्री ९ नंतरच येणार!