in

बेड्स असतानाही रुग्ण रांगेत का उभे आहेत? उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं

महाराष्ट्रासह गुजरातमधील कोरोनाची परिस्थिती देखील भयानक होत असल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये रुग्णालयाबाहेर कोरोनाग्रस्तांच्या रांगा लागल्याची परिस्थिती आहे. यासंबंधी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. माध्यमांनी देखील याचं रिपोर्टिंग केल्यानंतर आता उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने गुजरात सरकारला गंभीर प्रश्न विचारले आहेत.

गुजरातमधील परिस्थितीसंदर्भात विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांवर चिंता व्यक्त करत गुजरात उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाने यासंदर्भात स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली होती.

या याचिकेवर आज (१२ एप्रिल) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विविध मुद्दे उपस्थित करत सरकारकडे उत्तरं मागितली. त्यावरती मुख्य न्यायमूर्ती काही मुद्दे उपस्थित करत सरकारला प्रश्न विचारले. “कोरोना चाचण्या वेगाने करायला हव्यात. सर्वसामान्य माणसाला कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी ४ ते ५ दिवस लागतात. तर अशाच परिस्थितीत अधिकाऱ्यांना काही तासांत आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट मिळतो. तालुका आणि लहान गावांमध्ये कुठेही आरटी-पीसीआर चाचणी केंद्र नाहीत. गुजरातमध्ये जर २७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आलेली आहेत. तर मग प्रत्येक कोविड रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन का उपलब्ध नाहीये. किती इंजेक्शन वापराविना पडून आहेत, याचा शोध घ्या”, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायालयाने गुजरात सरकारला बेड्सच्या उपलब्धतेवरून देखील फटकारले. “रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री जास्तीच्या दराने का होत आहे, याचा राज्य सरकारने शोधावं. जर आपण म्हणता आहात की राज्यात ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध आहेत. तर मग लोकांना रांगेत का उभं रहावं लागत आहे”, असा सवाल न्यायालयाने केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवभुमीत भक्तांची अफाट गर्दी… कोरोना नियमांचे तीन तेरा

Gudi Padwa 2021 : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारने जारी केली नियमावली