in

परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मनसुख हिरेन याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती. सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आलीय. परंतु सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली होती.सुप्रीम कोर्टाने सुनवाणीदरम्यान ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली.

याचिकेतील मागण्या

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप सिंह यांनी याचिकेत केलेला होता. सिंह यांनी याचिकेत तीन मागण्या केल्या होत्या.
  • अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी.
  • मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी.
  • पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंह यांनी याचिकेत केल्या होत्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन वाझेबरोबर ट्रायडंट हॉटेलमध्ये गेलेली ती महिला कोण? एनआयएच्या तपासात आणखी माहिती उघड

आमीर खान कोरोना पॉझिटिव्ह