राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय देत हा धक्का दिला आहे. त्यामुळे आता देशमुख यांना सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमध्ये अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. सीबीआय चौकशी टाळण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान आज झालेल्या सुनावणीत सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागेल.
Comments
Loading…