गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या प्रकरणात राज्यात रणकंदन माजले असताना,आता लोकसभेतही यांचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी भाजपचे शिवसेनेसोबत २५ वर्ष संबंध होते. तरीही उद्धव ठाकरेंवर कशा पद्धतीने वैयक्तिक हल्ले केले,” असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे शून्य प्रहर काळात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर म्हणाल्या, ”शून्य प्रहरात महाराष्ट्रातील मुद्द्यावर आठ लोकांनी भूमिका मांडली.त्या आठ लोकांची नाव सुद्धा नव्हती. पण आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच पंतप्रधानांचा एक किस्साही सांगितला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की, हे दोन पक्ष कधीही वेलमध्ये येत नाहीत. जर आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत, तर आम्हाला बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. आमचा आवाज दाबला जाऊ नये अशी मागणी केली.
त्या पुढे म्हणाल्या, 25 वर्ष शिवसेनेबरोबर चांगले सबंध होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली हे विचार करून दंग झाल्याचे त्यांनी म्हटले. तरीही उद्धव ठाकरेंवर कशा पद्धतीने वैयक्तिक हल्ले केले,असे म्हणत हे सरकार यू टर्न सरकार असल्याचे टीकास्त्र प्रिया सुळे यांनी भाजपावर डागलं.
Comments
Loading…