in

Pandharpur Bypoll | घरची आणि पक्षाची जबाबदारी सोबतच… सुप्रिया सुळेंचं रुग्णालयाबाहेरून भाषण

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. दिवंगत आमदार भरत भालके यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र भागिरथ भालके यांना महाविकास आघाडीने तिकीट दिले आहे. त्यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतूनच रुग्णालयाबाहेरून व्हर्च्युअल सभा घेतली.

त्याच कारणही तितकच महत्वाचं आहे. सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच कोरोना परिस्थिती देखील भीषण होत चालल्याने सुप्रिया सुळे यांनी पंढरपुरात जाणं टाळलंय.

वडिलांवर शस्त्रक्रिया झाल्याने सुप्रिया सुळे मुंबईतच थांबून आहेत. अशावेळी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी भाषण केले आणि प्रचारात सहभागी झाल्या. वडील आजारी असले तरी त्यांच्याबरोबर राहून निवडणुकीतही मतदारांना आणि कार्यकर्त्यांना मतदानासाठी आवाहन त्यांनी केलं. सुप्रिया सुळे यांनी अशा दोन सभांना संबोधित केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SRH vs RCB | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायझर्स हैदराबादशी आज भिडणार

धारावीतल्या 18 वर्षांवरील सर्वांना लस द्यावी; खा. राहुल शेवाळे यांची मागणी