in

अमरावतीत म्युकरमायक्रोसिस संसर्गाबाबत सर्वेक्षण

म्युकरमायक्रोसिस रोगाबाबद जनजागृती करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात आशा सेविकांच्या माध्यमातून मोहीम सुरू करण्यात आलीये. या मोहिमे अंतर्गत उपचारानंतर बरे झालेल्या कोरोना बधितांच्या घरी भेटी देऊन याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना झाल्यानंतर म्युकरमायक्रोसिस आजाराने अनेकांना पछाडल आहे. त्यामुळे या आजाराचा जास्त प्रमाणात फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे वतीने ही मोहीम जिल्हाभरात राबविली जात आहे.

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २८९ म्युकरमायक्रोसिसचे रुग्ण आढळले आहेत.. तर १८६ रुग्णावर उपचार सुरू आहे.. यापैकी ११ रुग्णांचा म्युकरमायक्रोसिसने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता ही मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर आणखी किती रुग्ण म्युकरमायक्रोसिसचे जिल्ह्यात आहे हे स्पष्ट होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या डब्याला आग

Monsoon Update | अकोल्यात नाल्याला पुर; नागरीकांचे हाल