in

तिहार जेलमध्ये सुशील कुमारला मिळणार टीव्ही…

टोक्यो ऑलिम्पिकसाठी स्पर्धेला काही तासातच सुरवात होणार आहे, यासाठी अटकेत असलेल्या कुस्तीपटू सुशीलकुमारने वकिलाकडून टीव्हीची मागणी केली होती.सुशीलकुमारने जेलमधल्यात्याच्या बरॅकमध्ये टीव्ही हवा असल्याचा अर्ज तुरुंग प्रशासनाला केला होता. आता हि मागणी प्रशासनाने मान्य केली आहे.

“आम्ही सुशील कुमारच्या वॉर्डमधील कॉमन भागात टीव्ही लावण्याची अनुमती दिली आहे. त्याने टीव्हीवर ऑलिम्पिक बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे इतर कैद्यांसोबत तो टीव्ही बघू शकतो”, असं दिल्ली तुरुंग प्रशासक संदीप गोयल यांनी सांगितलं आहे.

सुशील कुमारने यापूर्वी दिल्ली विशेष न्यायालयात एक मागणी केली. आपलं कुस्तीपटू म्हणून करिअर पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुरुंगात आपल्याला कुस्तीपटूसाठीचा आहार मिळण्याची विनंती करण्यात आली होती.. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावली होती.

४ मे रोजी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडीयमबाहेर सुशीलकुमार आणि त्याच्या सहकार्यांच सागर धनकरसोबत भांडण झाल होत, हे भांडण एवढ वाढल कि सगळ्यानी मिळून सागर धनकरला मारहाण केली, हि मारहाण इतकी जास्त होती कि त्यामध्ये उपचारादरम्यान सागर धनकरचा मृत्यु झाला, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यांनंतर सुशीलकुमार फरार झाला होता, पोलिसांनी त्याला शिताफीने दिल्लीमधून अटक केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटीची धाव; ५ हजार ८०० प्रवाशांना सुखरूप सोडले

महाबळेश्वरच्या नागरी वस्तीत शिरले पाणी…जनजीवन विस्कळीत