in

बीडच्या अंबाजोगाईतील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

बीडच्या अंबाजोगाईतील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बालाजी भारत रुद्रवार आणि आरती बालाजी रुद्रवार या मृत पती-पत्नीची नावं आहेत. नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत ते राहत होते. विशेष म्हणजे या दाम्पत्याची चार वर्षाची मुलगी सुखरुप आहे.

त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान बुधवारी (7 एप्रिल) सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.

त्यानंतर पोलिसांनी दाखल झाल्यावर त्यांना घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. भारतीय वेळेनुसार गुरुवारी (8 एप्रिल) सकाळी नऊ वाजता स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत त्यांचा कुटुंबीयांना माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लॉकडाउनच्या भीतीने परप्रांतीय परतीच्या प्रवासाला

‘पहचान कौन?’ म्हणत मुख्यमंत्र्यावर टीका