in

मनसुख हिरेन यांच्या दुसऱ्या मोबाइलचं लोकेशन सापडलं… ‘एटीएस’ने केला धक्कादायक खुलासा

मनसुख हिरेन यांच्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन तुंगारेश्वर या ठिकाणी सापडलं आहे. त्यामुळे हत्या करून मृतदेह रेतीबंदर या ठिकाणी टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. एटीएसच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या बंगल्याबाहेर २५ फेब्रुवारीला जिलेटिनच्या २० कांड्या असणारी गाडी सापडली होती.

यामध्ये अंबानी कुटुंबीयांना धमकीचे पत्र देखील आले होते. यानंतर गाडीचे मालक हिरेन मनसुख यांच्या मृत्यूमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे सोपवला होता. मात्र त्यानंतर हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या हाती घेतल्याचे सोमवारी अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

राज्याच्या गृहविभागाने अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि मनसुख यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीची चोरी ही तीन प्रकरणे राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) शनिवारी सोपवली.

त्यानुसार एटीएसने तपास सुरू केला. त्यास ४८ तासही पूर्ण होत नाहीत तोच एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने स्फोटकांचे प्रकरण स्वत:कडे घेतले. यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा राज्यातील तपास यंत्रणांना डच्चू दिल्याच्या चर्चा आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकमध्ये ‘वीकेण्ड’ लॉकडाऊन; सातच्या आत घरात जाण्याचे आवाहन

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर