in ,

गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिवीर परत घ्या

जालन्यासह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा जास्त तर नागपूरसह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा कमी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करून गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिविर संबंधित जिल्ह्यांकडून तत्काळ परत घेण्याचा आणि ते रेमडेसिविर नागपूरसह इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये योग्य संख्येत वितरित करण्याचा आदेश नोडल अधिकाऱ्याला दिला.

२८ एप्रिल रोजी जालना जिल्ह्याला दहा दिवसांकरिता ३० हजार रेमडेसिविर देण्यात आले. रुग्णांच्या संख्येनुसार या जिल्ह्याला रोज ५९८ यानुसार १० दिवसाकरिता पाच हजार ९८० कुप्या रेमडेसिविर द्यायला पाहिजे होते. सरकारी रेकॉर्डनुसार २० एप्रिलपर्यंत जालना जिल्ह्यात सात हजार ६०३, तर नागपूर जिल्ह्यात ७८ हजार ४८४ कोरोना रुग्ण होते. असे असताना २८ एप्रिल रोजी नागपूरला एकही रेमडेसिविर देण्यात आले नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन तेंडूलकरकडून ‘मिशन ऑक्सिजन’साठी 1 कोटी रुपयांची मदत

रेमडेसिवीर प्रकरणी ‘या’ खासदारावर गुन्हा दाखल