in ,

Tamilnadu Election Result 2021 | अभिनेता कमल हसनने घेतली आघाडी

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीत ८ ते ११ या तीन तासांमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे डीएमकेने मोठी आघाडी घेतली आहे. डीएमके १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर एआयएडीएमके ७९ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडू बहुमताचा जादुई आकडा हा ११८ इतका आहे. यानुसार डीएमके बहुमताच्या आकड्याच्याही पुढे आहे. तर मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हसन हे कोयम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आघाडीवर आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या.
तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे.

येथील निवडणुकीत एडीएमने भाजपासोबत आघाडी केली असून डीएमके स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. सुरुवातीला हाती आलेल्या आकडेवाडीनुसार एम. के. स्टॅलीन यांच्या डीएमकेने 131 जागांवर आघाडी घेतली असून एआयएडीएमकेला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपाला अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही. तर, मक्कल निधी मय्यम पक्षाला केवळ पक्षप्रमुख असलेल्या कोईम्बतूर येथील जागेवरच आघाडी घेता आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर

RR Vs SRH| राजस्थान रॉयल्सचा सनरायजर्स हैदराबादशी सामना; नेतृत्वबदल हैदराबादला तारणार का?