in

Jitendra Awhad | ”टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम देणार”

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रीम प्रोजेक्टला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्थगिती दिली होती. या स्थगितीवर राजकारण तापल्यानंतर आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली. या भेटीनंतर बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली.या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासाच्या आत निर्णय झाला नसता असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘त्या’ बछड्यांना जन्म देणाऱ्या मादीने जागा हलविली

Indian Air Force | भारतीय हवाई दलात ‘मेगा भरती’