in

Tauktae Cyclone | रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह

तौक्ते वादळाचा तडाखा मुंबई हाय परिसरात तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसून झालेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसात आठ मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

अलिबागमध्ये ७ आणि मुरुडमध्ये १ मृतदेह आढळले आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर रायगड पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांचे डीएनएही घेण्यात येणार असून ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलीस आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दुधे यांनी सांगितले. तसेच गुजरातच्या वलसाडमध्येही ८ मृतदेह आढळले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलासा : मुंबई, ठाण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

IRCTC Push | ट्रेन तिकीट बुकिंगची माहिती आता मोबाईलवर मिळणार