in

Teach Update | जूनपासून गुगलची ‘ही’ सर्व्हिस बदलणार

1 जूनपासून गुगल आपली महत्वाची सर्व्हिस गुगल फोटोजचे (Google Photos) नियम बदलत आहे. या नवीन अपडेट अंतर्गत, 1 जून 2021 पासून, आपण अपलोड केलेले कोणतेही नवीन फोटो आणि व्हिडिओ केवळ युझर्ससाठी उपलब्ध असलेल्या 15 जीबी स्टोरेजमध्ये मोजल्या जातील. या सर्व्हिसचा परिणाम 1 जूनपूर्वी Google फोटोंमध्ये सेव्ह केलेल्या फोटोंवर लागू होणार नाही. परंतु 1 जूननंतरही हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओ 15 जीबीच्या मर्यादेमध्ये ठेवले जातील.

आपल्या Google अकाउंट स्टोरेजमध्ये आपले ड्राइव्ह, जीमेल, इ. शेअर केले जातात. त्याची मर्यादा केवळ 15 जीबी आहे. आपल्याला कंपनीकडून अधिक स्टोरेज क्षमता खरेदी करावी लागेल. आता त्यात Google फोटो समाविष्ट करून, मोठ्या स्टोरेज क्षमतेची आवश्यकता असेल. कंपनीचे म्हणणे आहे की,हा बदल त्यांना स्टोरेजच्या वाढत्या मागणीसह निरंतर राहण्यास मदत करेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona | मुकेश अंबानी महाराष्ट्राला करणार ऑक्सिजनचा पुरवठा

मुलाला मिठीत घेऊन आई-वडिलांची नदीत उडी मारून आत्महत्या