in

शिक्षकाच्या ‘अजिंठ्याच्या’ चित्राची जागतिक झेप; ‘टोर्सो इंडिया’चा पुरस्कार जाहीर

अनिल साबळे | औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक गजेंद्र आवारे यांच्या जगप्रसिध्द अजिंठ्याच्या लेणीचे पद्मपाणीच्या कँनवास वरील ऑईल कलर मधील चित्रास ‘ टोर्सो इंडिया’ या जागतिक संस्थेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यामुळे सिल्लोडचे नाव पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील भित्तीचित्रं काळाच्या ओघात नष्ट होत चालली आहेत. लेण्यांतील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच चित्रं आता शिल्लक राहिली आहेत. अनेक चित्रं दिसत नाहीत, धूसर झाली आहेत. तर काही चित्रांची मोडतोड झाली आहे. ही चित्रं कशी असतील याचा अभ्यास करून ती पूर्ण करण्याचा ध्यास काही चित्रकारांनी घेतला आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक गजेंद्र आवारे यांचे नाव आघाडीवर आहे.

आवारे यांनी अजिंठ्यातील चित्रं पुनरुज्जीवित करण्याचा बेत हाती घेतला आहे. सप्टेंबर 2017 ते जून 2021 असे जवळपास 4 वर्षे त्यांनी 148″*51″ इंच चे भव्य पद्मपाणी व भगवान बुद्ध व इतरांचे चित्र काढले.काळाच्या ओघात लेणीतील काही चित्र फिकट, लुप्त झाले ते चित्र मिळवताना त्यांना खूप दमछाक झाली. अनेक पुस्तके मिळवावी लागली. कँनवासवर चित्र काढताना महागडे रंग व इतर साहित्यावर हजारो रुपये खर्च झाले आहे. त्याचा या अपार कष्टाला अखेर फळ मिळाले आहे. कारण जगप्रसिध्द अजिंठ्याच्या लेणीचे पद्मपाणीच्या कँनवासवरील ऑईल कलरमधील चित्रास ‘टोर्सो इंडिया’ या जागतिक संस्थेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

टोर्सो इंडिया च्या उपक्रमात जागतिक स्तरावरील चित्रकाराचा समावेश आहे. यामध्ये सर्व पंच हे आंतरराष्ट्रीय असून मोठ्या पारदर्शकपणे विविध चित्राची निवड केली जाते. अशा ठिकाणी सिल्लोड सारख्या ग्रामीण भागातून गजेंद्र आवारे या शिक्षकाच्या चित्राची निवड जागतिक स्तरावर झाली असून ही महाराष्ट्रासह देशासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. त्यांना यासाठी पत्नी छाया आवारे व भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक श्रीकांत मिश्रा यांची मदत लाभली. दरम्यान अजिंठ्याच्या लेणीचे सर्व कँनवास वर पुनर्जीवीत करण्याचा मानस आवारे यांनी बोलून दाखविला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चित्रपटगृहातच होणार “83′ रिलीज

बिग बॅास सिझन १५ चा प्रोमो लॉंच …