in

48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच

TECNO नं आपला पोर्टफोलियो वाढवत Tecno Camon 18T हा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या ‘कॅमोन 18 सीरीज’ अंतर्गत सादर करण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स :

  • Tecno Camon 18T मध्ये 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.8 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले कंपनीनं दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कंपनीच्या हायओएस 8.0 वर चालतो.
  • या फोनला मीडियाटेकच्या हीलियो जी85 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅम म्हणजे एकूण 7 जीबी रॅमसह बाजारात आला आहे. यातील 128 जीबी इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. 48 मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरा ही टेक्नो कॅमोन 18टी ची खासियत आहे. विशेष म्हणजे या सेल्फी कॅमेऱ्यासह देखील कंपनीनं फ्लॅश दिला आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.
  • बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स ड्युअल सिम Tecno Camon 18T फोनमध्ये मिळतात. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवरील फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन फेस अनलॉक फीचर मिळतो.
  • पॉवर बॅकअपसाठी टेक्नो कॅमोन 18 टीमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18वॉट फ्लॅश चार्जला सपोर्ट करते. दरम्यान, या डिवाइसच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 12,300 भारतीय रुपयांच्या जवळपास आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची घेतली भेट…

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का ? शरद पवार म्हणाले…