in ,

अमेरिकन महिला टेनिसपटूनं मोदी-शाहंवर काय टीका केली?

अमेरिकेच्या माजी जगविख्यात टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा सध्या भारतामधील नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. या महिला टेनिसपटूने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रकरण काय?

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह कधीच नव्हते. भारतामधील आतापर्यंत सर्वाधिक चांगल्याप्रकारे लोकशाही मार्गाने काम करणारे ते नेते आहेत,” असं म्हटलं. मोदींना शाह यांनी मोस्ट डेमोक्रॅटीक म्हणजेच लोकशाहीचा सर्वाधिक आदर करणारे अशी उपाधी दिली.

मार्टिनाचं टि्वट –

नवरातिलोवाने ट्विट केलं आहे. तिने अमित शाह यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख असणाऱ्या वृत्तांकनाच्या पोस्टची लिंक शेअर करणारं ट्विट कोट करुन रिट्विट करताना हे वक्तव्य म्हणजे, “हा माझा पुढचा विनोद आहे,” असं म्हटलं आहे. म्हणजेच मोदी हे सर्वाधिक लोकशाही प्रिय नेते आहेत हे शाह यांचं वक्तव्य हस्यास्पद असल्याचा टोला नवरातिलोवाने लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol-Diesel Rate | जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

गोंदीयात एसटीच्या ८२ फेऱ्या वाढविल्या