in

कारचा भीषण अपघात! दोघे ठार , तर चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे यशोदा नदी पुला समोरील रपट्याच्या भिंतीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने अनियंत्रीत होत, जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

यवतमाळ येथील पोहरे कुटुंबातील सहा जण एमएच 38.1980 या क्रमांकाच्या मारुती अल्टो कारने यवतमाळवरून वर्धेकडे जात होते. तीव्र गतीमुळे देवळी येथील यशोदा पुलासमीप कार अनियंत्रित होऊन प्रथम दुभाजकावर चढली. नंतर अंदोरी कडे जाणाऱ्या रपट्याच्या भिंतीला जबरदस्त धडक दिली.

चालक राहुल रवी दिलीप पोहरे (36) हा घटनास्थळीच ठार झाले तर कार मधील दोन महिला आणि तीन लहान मुले गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीचे नाव स्मिता पोहरे, शर्मिता पोहरे, आरती पोहरे आणि अद्विक पोहरे असल्याचे समजले. सर्व जखमींवर देवळी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सावंगी रुग्णालयात हलविले आहे. या भीषण अपघातामुळे नागपूर -तुळजापूर या चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी खोळंबली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंग यांना दिलासा… १५ जूनपर्यंत कारवाई पुढे ढकलली

Maharashtra Cabinet Meet | ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार… खरीप हंगामात शेतकऱ्यांना पाठबळ