in

नवी मुंबईतील तुर्भेत कलर कंपनीला भीषण आग

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील एका रंगाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, कंपनीला आग कशामुळे लागली हे मात्र, अद्याप कळू शकले नाही. लॉकडाऊन लागू असल्यामुळे कंपनीत कामगारांची संख्या सुद्धा कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

5 State Assembly Election Results 2021 LIVE | बंगालमध्ये तृणमूल-भाजपमध्ये काँटे की टक्कर

West Bengal Election Results 2021 LIVE: बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसची गाडी सुसाट; भाजपची घोडदौड मंदावली?