in ,

Thane Lockdown | ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून लॉकडाउन

ठाणे महापालिका हद्दीतही करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आलं. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित केलं आहे. या हॉटस्पॉटमधील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून (९ मार्च) लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश काढले असून, हा लॉकडाउन सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउनप्रमाणेच कडक असणार आहे.

ठाणे शहरातील 16 विभाग हॉटस्पॉट घोषित करण्यात आले असून, 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत या भागात लॉकडाऊन असेल. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या भागांमध्ये असेल लॉकडाउन

१) आई नगर, कळवा
२) सूर्या नगर, विटावा
३) खरेगाव हेल्थ सेंटर
४) चेंदणी कोळीवाडा
५) श्रीनगर
६) हिरानंदानी इस्टेट
७) लोढा माजीवाडा
८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
९) लोढा अमारा
१०) शिवाजी नगर
११) दोस्ती विहार
१२) हिरानंदानी मिडोज
१३) पाटील वाडी
१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
१५) रुणवाल नगर, कोलबाद
१६) रुस्तोमजी, वृंदावन

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.

10 मार्च रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर कोरोनाचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी आणखी कडक पावलं राज्य सरकारकडून उचलण्याची शक्यता वर्तवली जातेय

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

10वी, 12वीच्या 52 हजार विद्यार्थ्यांचा परीक्षा न देण्याचा विचार

रणबीर कपूरला कोरोनाची लागण!