in

ठाण्यात आज लसीकरण बंद!

ठाण्यात उद्या महानगर पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद असणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. ट्विटर हँडलवरून म्हस्के यांनी ही माहिती दिली. या माहिती सोबतच नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

ठाण्यात देखील लसीच्या डोसचा अपुरा साठा आता जाणवू लागला असून या पार्श्वभूमीवर आज म्हणजेच गुरुवारी २९ एप्रिल रोजी ठाणे महानगर पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील असं पालिकेकडून जाहीर करण्यात आलं आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यासंदर्भातली माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

तसेच नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “लसीचा साठा संपल्यामुळे ठाण्यात उद्या महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील. आमची तयारी पूर्ण आहे. फक्त आता तुम्ही कमी पडू नका”, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सोबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिरूरमध्ये रहिवाशी शाळेत ४८ मुलींसह ९ शिक्षक कोरोनाबाधित

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला नागपुरातून अटक