in

पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू, मॉलमध्ये आढळला मृतदेह

नागपूर जिल्ह्यातील सीताबर्डी परिसरातील फॉरच्यून मॉलच्या पार्किंगमध्ये सुमारे २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा असून त्याचे नाव अभिषेक बघेल असे सांगण्यात येत आहे. सध्या शहरात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नागरिकांची येथे कुठलीही वर्दळ नाही. असे असूनसुद्धा मॉलच्या पार्किंमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने नागपूर शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण कालपासून बेपत्ता होता. यासंदर्भात तरुणाच्या आईने वाठोडा पोलीस ठाण्यात तरुण हरवल्याची तक्रार दाखल केली होती. आज दुपारच्या सुमारास मॉल च्या बेसमेंट पार्किंग मध्ये एक तरुण पडलेला असलेली सूचना मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह अभिषेक बघेल चा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या युवकाच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अभिषेक बघेल या युवकाचे वय जास्त नसल्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचे अनेक तर्क लावले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून करत आहेत. या घटनेमागे काय कारण आहे त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध पोलिस लवकरच घेतील अशी माहिती डीसीपी विनिता साहू यांनी सांगितली आहे.

अभिषेकचा मृत्यू संशयास्पद
बंद पडलेल्या फॉयूंन मॉल च्या बेसमेंट पार्किंग मध्ये अभिषेक चा मृतदेह आढळून आलाय त्या ठिकाणी कुणाचाही फारसा वावर नाही अभिषेक च्या बाजूला त्याची दुचाकी देखील पडलेली आढळून आली आहे . अभिषेकचा मृत्यू काल झाल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय. पोलिसांना घटनास्थळी फारसं काही आढळलेल नसलं तरी पार्किंग मध्ये लागलेले सीसीटीव्ही सुरू आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात, लॉकडाऊनचा पर्याय आहे, पण…