in

केरळमध्ये तृतीयपंथीय रेडीओ जॉकीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

केरळमधील पहिली तृतीयपंथी रेडिओ जॉकीचा मृतदेह सापड्याने एकच खळबळ उडाली आहे. अनन्या असे रेडीओ जॉकीचे नाव होते. अनन्याने विधानसभा निवडणूकदेखील लढली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारीदेखील ती पहिलीच तृतीयपंथी उमेदवार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अनन्याचा मृतदेह आढळून आला.

याआधी २८ वर्षीय अनन्याने लिंगबदल शस्रक्रियेनंतर आपली प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली होती. सर्जरीनंतर आपण बराच वेळ एका ठिकाणी उभं राहू शकत नाही तसंच काम करु शकत नसल्याचं तिने म्हटलं होतं. सर्जरीमध्ये झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अडचणी जाणवत असल्याची माहिती तिने दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यासंबंधी तक्रारींमुळे मृत्यू झाल्याची शंका आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान अनन्याच्या मित्रांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नव्या फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल, पाहा फोटो

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र