in ,

पत्नी,मुलाचा खून करून पसार झालेल्या आबिद शेखचा मृतदेह सापडला

सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत आलिया शेख वय ३५ हिचा तर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नवीन कात्रज बोगद्याजवळ आयान शेख या चिमुरड्याचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना पुणे सातारा रस्त्यावर एक बेवारस कार सापडली होती. या कारची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित अभिषेक हा पायी जाताना पोलिसांना दिसून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. यासाठी पुणे पोलिसांनी सात वेगवेगळी पथके स्थापन केली होती.

दरम्यान आज सकाळी खानापूर गावाजवळील नदीच्या पात्रात एक मृतदेह असल्याची माहिती हवेली पोलिसांना मिळाली होती. हवेली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण पोलीस आणि त्यानंतर पुणे पोलिसांना याची माहिती दिली. पुणे पोलिसांचे एक पथक सध्या घटनास्थळी रवाना झाला आहे. आबिद शेख यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वीज पडून वडिलांचा मृत्यु तर २ वर्षीय चिमुकली जखमी

तुम्ही भेसळयुक्त दूध तर पित नाही ना…