in ,

केंद्र सरकारने अशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल, गॅसवरील दरवाढ मागे घ्यावी; सुप्रिया सुळेंचा टोला

‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती’, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्वीटवरून निर्मला सितारमण यांचे अभिनंदन करत टोलाही लगावला आहे.

गेल्या काही काळापासून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल-डिझेलने तर शंभरीही गाठली. तसेच गॅसच्या किंमतीतही सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त बोझा पडत आहे. याचाच उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने जशी तत्परता अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे घेण्यात दाखवली, तशीच पेट्रोल, डिझेल, गॅसवरील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

अशी होणार होती व्याजकपात

  • पीपीएफवरील व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 6.4 टक्के केला आहे. 0.7 टक्क्यांनी ही कपात केली आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ही व्याजदर कपात असेल.
  • मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक पालक सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करतात. मात्र या योजनेत व्याजदरात 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्किममधील गुंतवणुकीवरील व्याजदरात 90 बेसिक पॉईंटने कपात केली आहे. आता 6.5 टक्के एवढा व्याजदर राहील.
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी) व्याज दर 6.8 टक्क्यांवरून 5.9 टक्के केला आहे. तब्बल 0.9 टक्के व्याजदर कपात आहे.
  • किसान विकासपत्रचा व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 6.2 टक्के केला आहे. तसेच 124 महिन्यांऐवजी तब्बल 138 महिन्यांपर्यंत मॅच्युरिटी कालावधी वाढविला आहे.
  • बँकेतील बचत ठेवीवर 1 वर्षासाठी सध्या 4 टक्के व्याज होते. आता 3.5 टक्के मिळेल. 5 वर्षांसाठी बचत ठेवीवर 6.7 टक्के व्याज मिळत होते. उद्यापासून 5.8 टक्के मिळेल. पाच वर्षांसाठीच्या – रिकरिंगवरील व्याजात 50 बेसिक पॉईंटने कपात करून 5.3 टक्के केली आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २७८० कोटींची घोषणा; नितीन गडकरी यांची माहिती

Assembly Election 2021 | नंदीग्रामसह तमलुक, हल्दिया मतदारसंघात कलम १४४ लागू