in

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरची पळवापळवी

Debris is scattered near a tanker truck carrying liquid oxygen at the Kaiser Permanente medical office building in Santa Rosa, Calif., Wednesday, July 18, 2018. No patients or medical employees were injured in the blast that 911 callers said caused buildings to shake. (Beth Schlanker/The Press Democrat via AP)

रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाठोपाठ आता ऑक्सिजनचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. त्यातच आता ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरची पळवापळवी सुरू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला. प्रशासनाने यात लक्ष घालून पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून समान वाटप केले नाही, तर खासगी कोविड रुग्णालये बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिस बंदोबस्तात सरकारी रुग्णायात नेण्यात आलेल्या टँकरमधील अर्धा ऑक्सिजन खासगी रुग्णालयांना देण्यात आला.

गुरूवारी ९ टन ऑक्सिजनचा एक टँकर पोलिस बंदोबस्तात नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत होता. मात्र, त्याची मागणी नगरमधील खासगी रुग्णालयांनीही नोंदविली होती. मात्र, हा टँकर आपल्याकडे न येता जिल्हा रुग्णालयात निघाल्याचे पाहून खासगी रुग्णालयाचे डॉक्टर तेथे धावत आले. त्यांनी टँकर अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांपुढे त्यांचे चालेना. ऑक्सिजन नाही मिळाला तर आमच्या रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू होईल, असे सांगत डॉक्टरांनी तेथेच आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे अर्धा ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयात आणि अर्धा खासगी रुग्णालयांना असा तोडगा काढण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स

‘लोक मरतात हे उद्धव ठाकरेंचे पाप’ – नारायण राणे