in ,

लढा संपलेला नाही, पुढची कारवाई करणार – अशोक चव्हाण

सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण रद्द करण्याच्या आजच्या निर्णयावर राज्य सरकारने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. यावेळी लढा संपला नसून या पुढची कारवाई करणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आम्ही आजपर्यंत संवैधानिक प्रक्रियेने आणि पूर्ण क्षमतेने हा विषय मांडल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

हा कायदा १०२व्या घटनादुरुस्तीनंतरचा आहे. या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना नवा कायदा करण्याचा अधिकार राहिलेला नव्हता. मात्र, त्यावेळी अॅटर्नी जनरल अगोदर म्हणाले की, राज्यांना अधिकार नाहीत. आणि त्यानंतर मात्र त्यांनी राज्याला कायदा करण्याचे अधिकार असल्याचं सांगितलं. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. आजच्या निकालाची प्रत अद्याप हातात आलेली नाही. मात्र, आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे की घटनादुरुस्तीनंतर नवा कायदा करण्याचा अधिकार नसतानाही हा कायदा करण्यात आल्याने न्यायालयाने हा कायदा अस्विकृत केला आहे. निकालाची प्रत हाती आल्यानंतर यावर अधिक बोलता येईल मात्र, फडणवीसांनी त्यावेळी सबागृहाची दिशाभूल केली आणि आता ते फसवणूक करत आहेत. त्यावेळी त्यांनी अधिकार नसताना हा कायदा संमत केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

फडणवीसांना अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला; अशोक चव्हाणांचा पलटवार