राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या ८ शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बंगळुरू यांचा समावेश आहे. देशात गेल्या 24 तासात 56 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 23 टक्के, पंजाबमध्ये 8.82 टक्के, छत्तीसगडमध्ये 8 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 7.82 टक्के, तामिळनाडुत 2.04 टक्के, कर्नाटकमध्ये 2.45 टक्के, गुजरातमध्ये 2.2 टक्के तर दिल्लीत 2.04 टक्के इतका रुग्णवाढीचा वेग आहे.
कोरोना पसरण्याचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणावेळी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं या बाबी कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे.
Comments
Loading…