in

“कपिल शर्मा शो ” पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कपिल शर्मा शो च्या फॅन्ससाठी मोठी बातमी आहे, सगळ्यांचा आवडता शो द कपिल शर्मा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे, कपिल शर्मा आणि त्याच्या लोकप्रिय शो मध्ये नवीन रुपात येणार असून सध्या त्याने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले.


सध्या कपिल शर्मा सोशल मिडीयावर बराच सक्रीय आहे, आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल आपल्या चाहत्यांना माहिती देतोय, बऱ्याच दिवसांपासून या शो ची चर्चा रंगताना दिसून येत होती, पण आता त्याने स्वत:शो च्या कलाकारांसोबत फोटो शेअर केला, या फोटो वरून लवकरच हा शो आपल्या भेटीला येणार आहे.


कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. फोटो शेअर करत त्याने जुन्या लोकांसोबत नवीन सुरवात #blessing, #thekapilsharmashow, #comingsoon असे हॅशटॅग देखील दिले. कपिलने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, चंदन प्रभाकर, भारती सिंह आणि कीकू शारदा असे सह कलाकार दिसत आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमेरिकन टेनिसपटूला कोरोनाची लागण

Maharashtra FYJc CET 2021 | ११वीच्या प्रवेशाची तारीख जाहीर, जाणून घ्या!