छत्तीसगडमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत संरक्षण दलांचे २२ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड आहे. दरम्यान हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नसल्याचं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) संचालक कुलदीप सिंह यांनी म्हटलं आहे.
“हे गुप्तचर यंत्रणा किंवा ऑपरेशनल अपयश होतं असं बोलण्यात काही अर्थ नाही. जर हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असतं तर संरक्षण दलाचे जवान ऑपरेशनसाठी गेले नसते. आणि जर हे ऑपरेशनल अपयश असतं तर इतक्या मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले नसते”.
“जखमींना आणि मृतदेह नेण्यासाठी नक्षलवाद्यांकडून तीन ट्रॅक्टर वापरण्यात आले. सध्याच्या घडीला किती नक्षलवादी ठार करण्यात आले याची संख्या सांगणं कठीण आहे. पण ही संख्या २५ ते ३० पेक्षा कमी नसावी,” असंही ते म्हणाले आहेत. कुलदीप सिंह यांनी आपण जखमी जवानांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. शहीद झालेल्यांमध्ये सात सीआरपीएफ जवानांचाही समावेश आहे अशी माहिती कुलदीप सिंह यांनी सांगितले.
Comments
Loading…