in

Corona third wave | बालरोगतज्ज्ञांना पालिका देणार विशेष प्रशिक्षण

corona-third-wave-Bmc – special-training-pediatricians


करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा धोका लक्षात घेऊन मुंबई पालिकेने मुंबईतील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यासाठी विभागस्तरावर कृती आराखडाही तयार करण्यात येईल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. या पार्श्वभूमी वर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळाचे उपायुक्त, २४ प्रशासकीय विभागांचे साहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी यांना कार्यवाही आणि अंमलबजावणीबाबत विशेष निर्देश देण्यात आले.
बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण प्रत्यक्षात देण्यात येणार आहे. यासाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन तुकड्यांमध्ये करण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासाठी खास ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमधील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर मुंबईत पुन्हा कठोर निर्बंध

Maratha Reservation | “आम्ही सरकारसोबत चर्चेसाठी तयार”