in

लोकशाही च्या बातमीचा दणका मंत्रालयाच्या अधिकाऱ्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल

लोकशाहीने पीडित महिलेला न्याय मिळवून दिल्यामुळे लोकशाहीचे रिपोर्टर सुरेश काटे यांचा महिलांनी केला सन्मान मंत्रालयात जलसंपदा विभागात कार्यरत असलेल्या शिवाजी रामचंद्र आव्हाड अधिकाऱ्याने महिलांशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्रिकरून छेडछाड करत असल्याची बातमी लोकशाहीने दाखवल्या नंतर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी शिवाजी आव्हाडवर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. लोकशाहीने पीडित महिलेला न्याय मिळवून दिल्यामुळे लोकशाही न्यूज रिपोर्टर सुरेश काटे यांचा सन्मान करून लोकशाही न्यूज चॅनलचे महिलांनी आभार मानले.

नक्की काय आहे प्रकरण
महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. शिवाजी आव्हाड असे अधिकाऱ्याचे नाव आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आव्हाड याने बदलापूर परिसरातील रहिवाशी सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या महिलेशी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यांना स्वत:च्या सामाजिक संस्थेची नोंदणी करून देतो सांगत ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या मैत्रिमीला देखील नगरसेविका बनवतो, असे सांगत तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण केले. त्यानंतर आव्हाडने महिलांना कल्याणमधील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.पीडित महिला हॉटेलमध्ये इतर महिलांसह पोहोचली. त्यानंतर संतापलेल्या या महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठून चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जुगारात हरला म्हणून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची तरुणाला मारहाण

Kalyan west