in

मुलाला मिठीत घेऊन आई-वडिलांची नदीत उडी मारून आत्महत्या

‘मुलीला आणि वडिलांना सांभाळा,’ अशी चिठ्ठी लिहून घराबाहेर पडले आणि आपल्या मुलाला मिठीत घेऊन आई-वडिलांनी रात्री अंधारातच कुंभी नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात घडली. गोठे येथे घडलेल्या या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. दीपक शंकर पाटील (४०), वैशाली दीपक पाटील (३५) आणि विघ्नेश अशी मृतांची नावे आहेत.

दीपक पाटील हे पत्नी, दोन मुलांसह गोठे येथे राहात होते. आईचे निधन झाले असून, त्यांच्यासोबत वडीलही राहतात. शेतीबरोबरच पशूपालन व्यवसाय करत हे कुटुंब आनंदात राहात होते. मात्र, गुरुवारी रात्री दीपक पाटील आपल्या पत्नी आणि मुलासह घराबाहेर पडले. त्यांनी गावाजवळ असलेल्या कुंभी नदीत उडी मारली. आई-वडिलांनी आपल्या १३ वर्षाच्या मुलाला सोबत दोरीने घट्ट बांधले होते. तिघांनी एकमेकांना मिठी मारली होती.

दीपक यांना एक मुलगी असून ती आठवीत शिकत आहे. परीक्षा रद्द झाल्याने ती चारच दिवसांपूर्वी मामाकडे राहायला गेली होती. त्यामुळे ती वाचली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. जीवनात अपयशी ठरल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. आपल्या वडिलांना आणि मुलीला सांभाळा अशी विनंतीही या चिठ्ठीतून त्याने आपल्या मित्रांना केली आहे. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Teach Update | जूनपासून गुगलची ‘ही’ सर्व्हिस बदलणार

Break the chain | लग्नाला नक्की यायचं ! पण …